Udak Shanti Puja
★
4.8
(144 reviews)
4.7
(210 reviews)
₹10,500
(Inclusive of samagree)
उदक शांती पूजा | संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा
उदक शांती पूजा म्हणजे काय व ती का करतात?
उदक शांती पूजा ही नवीन घरात शुभता, शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी केली जाणारी एक पवित्र वैदिक पूजा आहे.
‘उदक’ म्हणजे पाणी आणि ‘शांती’ म्हणजे संतुलन, शुद्धता व स्थैर्य.
या पूजेमध्ये वैदिक मंत्रांच्या साहाय्याने पाण्याचे शुद्धीकरण केले जाते आणि त्या पवित्र जलाने संपूर्ण घर शुद्ध केले जाते.
ही पूजा विशेषतः वास्तुशुद्धी, ग्रहदोष निवारण आणि नवीन वास्तूत सुख-समृद्धी नांदावी यासाठी केली जाते.
उदक शांती पूजा कधी करावी?
उदक शांती पूजा पुढील प्रसंगी करणे अत्यंत शुभ मानले जाते:
- नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये किंवा नवीन ऑफिस मधे प्रवेश करताना (गृहप्रवेशावेळी).
- घरात नकारात्मक ऊर्जा,वारंवार अडचणी, भांडणे किंवा मानसिक अशांतता जाणवत असल्यास.
- घराच्या नूतनीकरणानंतर.
- वास्तुदोष असल्यास.
घरातील कोणी व्यक्ती वारल्यानंतर चौदाव्या दिवशी
तसेच सुदृढ आरोग्य, चांगले नाते आणि कुटुंबातील सुख-समृद्धीसाठी ही पूजा करण्याचा सल्ला दिला जातो.
संपूर्ण विधीबद्दल माहिती
- पहिल्या चौरंगावर पूजेची सुरुवात गणपती पूजन व संकल्प विधीने केली जाते.
- कलश पूजन – विश्वातील दैवी ऊर्जा व संतुलनाचे प्रतीक.
- दुसऱ्या चौरंगावर ब्रह्ममंडलदेवतेंची स्थापना केली जाते.
- यात प्रामुख्याने एका कलशामध्ये गुगुळाचा धूर साठवला जातो व पंचगव्य (दूध,दही,तूप,मध,गोमूत्र),गंगाजल आणि विविध औषधी वनस्पती एकत्र करून पवित्र असे जल त्या कलशात भरले जाते नंतर त्यावर पुण्याह वाचन विधी केला जातो.
- नंतर कलशावर एका पूर्णपात्रात ब्रह्म देवतेची स्थापना केली जाते त्यावर दर्भाची झोपडी उभी केली जाते.
- उपस्थित गुरुजी यावेळी विशेष मंत्रजप,कात्यायन सूक्त,रुद्रसूक्त आणि शांतिपाठ याचे पठण करतात.
- तयार केलेल्या पवित्र जलाने संपूर्ण घर शुद्ध केले जाते (घरात जल शिंपडले जाते).
- प्रसाद वितरण करून पूजेचा समारोप केला जातो.
संपूर्ण उदक शांती पूजा साधारणतः २ ते ३ तास चालते.
उदक शांती पूजेचे लाभ
- घरात सकारात्मक ऊर्जा व शांत वातावरण निर्माण होते
- वास्तुदोष, नकारात्मक शक्ती व अनिष्ट प्रभाव कमी होण्यास मदत होते
- कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य व मानसिक स्थैर्य सुधारते
- आर्थिक अडचणी,तणाव व दैनंदिन भांडणे कमी होण्यास सहाय्य होते
- नवीन घर राहण्यास योग्य, पवित्र व शुभ वातावरणात रूपांतरित होते
वंदन उदक शांती पूजा वैशिष्ट्ये
- उदक शांती पूजा शास्त्रोक्त, नियोजनबद्ध आणि शांत पद्धतीने केली जाते
- प्रत्येक विधीचा अर्थ आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेत स्पष्ट केला जातो
- पूजेची मांडणी स्वच्छ, सुबक व सकारात्मक वातावरण निर्माण करणारी असते
- पूजेसाठी लागणारी संपूर्ण सामग्री वंदन तर्फे उपलब्ध करून दिली जाते
मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात उदक शांती पूजा विधी करण्यासाठी वंदन हे विश्वासार्ह नाव मानले जाते.
आम्ही आजपर्यंत ५०० पेक्षा जास्त उदक शांती पूजा विधी यशस्वीपणे पार पाडले आहेत.
उदक शांती पूजेची दक्षिणा काय असते?
९०% पूजासामग्रीसह संपूर्ण उदक शांती पूजेची दक्षिणा ₹ १०,५०१/- असेल.
यामधील ₹ १,१०१/- रक्कम बुकिंग अमाउंट म्हणून आगाऊ घेतली जाईल.
उर्वरित दक्षिणा पूजा पूर्ण झाल्यानंतर देऊ शकता.
वर दिलेल्या पॅकेजव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त खर्च किंवा किंमत आपल्याला द्यावी लागणार नाही.
आजच आपली उदक शांती पूजा बुक करा
📞 ८१०४०३०३०० या क्रमांकावर आजच आमच्याशी संपर्क साधा
आणि शांत, अर्थपूर्ण व शास्त्रोक्त उदक शांती पूजेचा अनुभव वंदनसोबत घ्या.
What is Udak Shanti Puja and Why Is It Performed?
Udak Shanti Puja is a sacred Vedic ritual performed to create auspiciousness, peace, and positive energy in a new home or workspace.
The word ‘Udak’ means water and ‘Shanti’ signifies balance, purity, and stability.
In this puja, water is ritually purified through Vedic mantras, and the sanctified water is then used to purify the entire house.
Udak Shanti Puja is especially performed for Vastu purification, pacification of planetary influences, and to ensure prosperity and harmony in a new property.
When Should Udak Shanti Puja Be Performed?
Udak Shanti Puja is considered highly auspicious on the following occasions:
- While entering a new house, flat, or office (during Griha Pravesh)
- If there is negative energy, repeated obstacles, frequent conflicts, or mental unrest at home
- After home renovation or structural changes
- If Vastu defects are identified
- On the 14th day after the demise of a family member
This puja is also recommended for good health, harmonious relationships, and overall family prosperity.
Complete Ritual Process
- On the first chowrang (altar), the puja begins with Ganesh Puja and Sankalp.
• Kalash Puja is performed, symbolizing divine energy and cosmic balance.
• On the second chowrang, the Brahma Mandal deities are invoked.
• A kalash is prepared by collecting guggul smoke, and a sacred mixture of Panchagavya (milk, curd, ghee, honey, cow urine), Gangajal, and medicinal herbs is filled into it.
• Punyahavachan is performed over the kalash to sanctify the water.
• A Brahma Devata is established on a complete vessel (Purnapatra), over which a darbha hut is formed.
• The priests chant special mantras, Katyayani Sukta, Rudra Sukta, and Shanti Path.
• The sanctified water is then sprinkled throughout the house to purify the space.
• The ritual concludes with Prasad distribution.
The complete Udak Shanti Puja generally takes 2 to 3 hours.
Benefits of Udak Shanti Puja
- Creates positive energy and a peaceful atmosphere in the home
• Helps reduce Vastu defects, negative influences, and adverse energies
• Improves health and mental stability of family members
• Assists in reducing financial stress, tension, and everyday conflicts
• Transforms a new house into a pure, auspicious, and livable space
Why Choose Vandan for Udak Shanti Puja?
- Udak Shanti Puja is performed strictly according to Vedic traditions, in a planned and peaceful manner
• Each ritual is explained in simple language for easy understanding
• The puja setup is clean, well-organized, and positivity-focused
• All required puja materials are arranged by Vandan, ensuring a smooth experience
Vandan is regarded as a trusted name for performing Udak Shanti Puja across Mumbai, Pune, Nashik, and the entire Maharashtra.
We have successfully conducted 500+ Udak Shanti Puja rituals to date.
Udak Shanti Puja Charges (Dakshina)
The total dakshina for the complete Udak Shanti Puja, including 90% of the required puja materials, is ₹10,501/-.
An advance booking amount of ₹1,101/- is required.
The remaining dakshina can be paid after the puja is completed.
There are no additional or hidden charges beyond the above-mentioned package.
Book Your Udak Shanti Puja Today
📞 Contact us today at 8104030300
and experience a peaceful, meaningful, and scripturally performed Udak Shanti Puja with Vandan.


