Satyanarayan Puja
★
4.9
(165 reviews)
4.7
(210 reviews)
₹5,100
(Inclusive of samagree)
सत्यनारायण पूजा | संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा
सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची उपासना असून, हिंदू धर्मातील एक अत्यंत मंगल आणि पवित्र धार्मिक विधी मानली जाते. ही पूजा घरामध्ये (Satyanarayan puja at home) केली जाते, ज्यामुळे घरात शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
या पूजेमध्ये सत्यनारायण व्रत कथा सांगितली जाते, जी पाच अध्यायांत विभागलेली असून त्यातून ईश्वरभक्तीचे महत्त्व, सत्याची शक्ती आणि सद्गुणांचे पालन यांचे संदेश दिलेले आहेत. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तसेच नव्या शुभ प्रारंभासाठी ही पूजा केली जाते.
अनेक कुटुंबे ही पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी अनुभवी Satyanarayan puja pandit Pune यांची सेवा घेतात, जेणेकरून सर्व विधी योग्य मंत्रोच्चारांसह व परंपरेनुसार पार पडतील.
सत्यनारायण पूजा कधी करावी?
सत्यनारायण पूजा खालील प्रसंगी केली जाते:
- कोणतेही शुभ कार्य पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
- नवीन घरात प्रवेश करताना (गृहप्रवेशावेळी) घरात शांती व समृद्धीसाठी
- विवाहानंतर वैवाहिक जीवन सुखी राहावे म्हणून
- जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा कौटुंबिक विशेष प्रसंगी
- नवीन व्यवसाय, नोकरी किंवा कार्याची सुरुवात करताना
- संकटातून मुक्ती मिळावी, मनःशांती व सकारात्मकतेसाठी
वंदन मार्फत सत्यनारायण विधी शास्त्रोक्त पद्धतीने कसा केला जातो?
- पूजेची सुरुवात आचमन व प्राणायामाने करून शरीर व मन शुद्ध केले जाते
- त्यानंतर संकल्प विधी केला जातो, ज्यामध्ये देवतांना आमंत्रित करून मनातील इच्छा व्यक्त केल्या जातात
- सर्वप्रथम गणेश पूजन करून पूजेचा शुभारंभ केला जातो
- पुढे कलश स्थापना केली जाते
- भगवान सत्यनारायणाची मूर्ती किंवा प्रतिमेचा पंचामृत अभिषेक करून फुले, फळे व नैवेद्य अर्पण केला जातो
- पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली सत्यनारायण व्रत कथा वाचली जाते आणि सर्व उपस्थित भक्त श्रद्धेने ती ऐकतात
- शेवटी आरती करून पूजेचा समारोप केला जातो
- प्रसाद म्हणून रवा, साखर व तुपाचा शिरा (सत्यनारायण प्रसाद) वाटला जातो
वंदन मार्फत सत्यनारायण पूजा पूर्णपणे शास्त्रोक्त आणि परंपरेनुसार केली जाते.
संपूर्ण सत्यनारायण पूजा साधारणतः १.५ ते २ तास चालते, विधी आणि उपस्थित सदस्यांच्या संख्येनुसार वेळ थोडा बदलू शकतो.
वंदन सत्यनारायण पूजा वैशिष्ट्ये
- मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात सत्यनारायण पूजा विधी करण्यासाठी वंदन हे विश्वासार्ह नाव मानले जाते. आम्ही आजपर्यंत ५०० पेक्षा जास्त सत्यनारायण पूजा विधी यशस्वीपणे पार पाडले आहेत.
- सत्यनारायण पूजा शास्त्रोक्त, शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने केली जाते. प्रत्येक विधीचा अर्थ सोप्या शब्दांत समजावून सांगितला जातो, त्यामुळे पूजा अधिक अर्थपूर्ण वाटते
• पूजेची मांडणी स्वच्छ, सुबक व सौम्य वातावरण निर्माण करणारी असते
• पूजेची आवश्यक संपूर्ण सामग्री वंदन तर्फे उपलब्ध करून दिली जाते
पूजेची दक्षिणा काय असते?
९०% पूजा सामग्रीसह संपूर्ण सत्यनारायण पूजेची दक्षिणा ₹ 3101/- असेल.
यामधील ₹501/- रक्कम बुकिंग अमाउंट म्हणून आगाऊ घेतली जाईल. उर्वरित दक्षिणा पूजा पूर्ण झाल्यानंतर देऊ शकता.
वर दिलेल्या पॅकेजव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त खर्च किंवा किंमत आपल्याला द्यावी लागणार नाही.
आजच आपली सत्यनारायण पूजा बुक करा
📞 ८१०४०३०३०० या क्रमांकावर आजच आमच्याशी संपर्क साधा
Satyanarayan Puja | Services Across Maharashtra
Satyanarayan Puja is a sacred ritual dedicated to Lord Vishnu in his Satyanarayan form and is regarded as one of the most auspicious ceremonies in Hindu tradition.
This puja is usually performed at home or Office Hospital or other commercial spaces, creating an atmosphere of peace, gratitude, and positive energy within the household.
A key part of this ritual is the Satyanarayan Vrat Katha, narrated in five chapters. The story highlights the importance of devotion, truth, discipline, and righteous living.
Families perform this puja to express gratitude after wishes are fulfilled, to seek divine blessings, and to mark new and auspicious beginnings in life.
To ensure the puja is conducted correctly and meaningfully, many families choose experienced and Vedic-trained pandits, so that every ritual is performed with proper mantras and traditional discipline.
When Should Satyanarayan Puja Be Performed?
Satyanarayan Puja is commonly performed on the following occasions:
- After the successful completion of any auspicious event, as an expression of gratitude
- During Griha Pravesh (housewarming) to bring peace and prosperity into the new home
- After marriage, for harmony and stability in married life
- On birthdays, wedding anniversaries, or special family occasions
- At the beginning of a new business, job, or important venture
- During challenging phases, for mental peace, clarity, and positivity
How Is Satyanarayan Puja Performed Through Vandan?
- The puja begins with Achaman and Pranayama to purify the body and calm the mind
- A Sankalp is taken, inviting the deities and clearly stating personal intentions and prayers
- Ganesh Puja is performed first to ensure an obstacle-free and auspicious start
- Kalash Sthapana is then carried out
- The idol or image of Lord Satyanarayan is worshipped with Panchamrut Abhishek, flowers, fruits, and naivedya Under the guidance of the pandit, the Satyanarayan Vrat Katha is recited and attentively heard by all family members
- The ritual concludes with Aarti
- Prasad, prepared using rawa, sugar, and ghee (Satyanarayan Prasad), is distributed
At Vandan, Satyanarayan Puja is conducted strictly according to scriptures and traditional practices, ensuring a calm, meaningful, and spiritually fulfilling experience.
The complete puja usually takes 1.5 to 2 hours, depending on the rituals involved and the number of participants.
Why Choose Vandan for Satyanarayan Puja?
- Vandan is regarded as a trusted name for Satyanarayan Puja services across Mumbai, Pune, Nashik, and the entire Maharashtra
- We have successfully conducted 500+ Satyanarayan Puja rituals to date
- Every puja is performed in a Shastric, peaceful, and well-organized manner
- The significance of each ritual is explained in simple and understandable language
- The puja setup is clean, aesthetic, and spiritually soothing
- All essential puja materials are arranged by Vandan, ensuring a completely hassle-free experience
Puja Charges
- The total dakshina for the complete Satyanarayan Puja, including 90% of the required puja materials, is ₹3,101/-.
- An advance booking amount of ₹501/- is required.
- The remaining amount can be paid after the puja is completed.
- There are no additional or hidden charges beyond the above-mentioned package.
Book Your Satyanarayan Puja Today
📞 Contact us today at 8104030300
and book your Satyanarayan Puja with Vandan for a peaceful and meaningful experience.




