Vandan Pandit

Rudrabhishek Puja
4.8 (210 reviews)

4.7

(210 reviews)

15,100

(Inclusive of samagree)

रुद्राभिषेक/लघुरुद्र अभिषेक पूजा  |संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा

रुद्राभिषेक / लघुरुद्र अभिषेक पूजा ही भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी केली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची वैदिक पूजा आहे. या पूजेमध्ये भगवान शंकराच्या शिवलिंगावर विविध पवित्र द्रव्यांनी अभिषेक केला जातो आणि रुद्रसूक्त, वैदिक मंत्र तसेच महामृत्युंजय जप यांचे पठण केले जाते.

रुद्र’ म्हणजे भगवान शिव आणि ‘अभिषेक’ म्हणजे पवित्र जल, गंगाजल, दूध व इतर द्रव्यांनी केलेली उपासना. या विधीद्वारे जीवनातील अडचणी, मानसिक अस्थिरता, आरोग्यविषयक समस्या आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रार्थना केली जाते.

ही पूजा शांती, उत्तम आरोग्य, स्थैर्य आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त करण्यासाठी केली जाते. योग्य शुभ मुहूर्त पाहून रुद्राभिषेक पूजा केल्यास तिचा परिणाम अधिक सकारात्मक आणि फलदायी मानला जातो.

संपूर्ण विधीबद्दल माहिती
  • पूजेची सुरुवात गणपती पूजन व संकल्पाने केली जाते, जेणेकरून पूजा निर्विघ्न पार पडून जीवनातील अडथळे दूर होतील.
  • त्यानंतर वरूण पूजन व पुण्याह वाचन केले जाते, ज्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते.
  • पुढे शिवलिंगावर क्रमाने गंगाजल, दूध, दही, मध, तूप, बेलपत्र, गूळ, साखर व फळांचे रस यांचा अभिषेक केला जातो, ज्याचा उद्देश जीवनातील नकारात्मकता दूर करणे हा असतो.
  • या वेळी रुद्रसूक्त, महामृत्युंजय मंत्र आणि “ॐ नमः शिवाय” या मंत्रांचे पठण केले जाते, जे अनेक समस्यांवर उपाय म्हणून केले जाते विशेषतः career problems दूर होण्यासाठी आणि business growth साठी अत्यंत प्रभावी मानले जातात.
  • पूजा पूर्ण झाल्यानंतर शिव आरती केली जाते आणि सर्वांना प्रसाद वाटप केले जाते, ज्यामुळे शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

संपूर्ण रुद्राभिषेक पूजा साधारणतः २ ते ३ तास चालते.

रुद्राभिषेक/लघुरुद्र अभिषेक पूजेचे लाभ
  • शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होते
  • दीर्घायुष्य व मानसिक स्थैर्य प्राप्त होते
  • ग्रहदोष, शनि दोष व कालसर्प दोष शांतीस मदत होते
  • घर, कुटुंब व व्यवसायात सुख-शांती व समृद्धी वाढते
  • आयुष्यातील अडथळे, संकटे व आर्थिक अडचणी दूर होण्यास सहाय्य होते
  • भगवान शिवाच्या कृपेने शांतता, सकारात्मक ऊर्जा व आध्यात्मिक प्रगती होते
वंदन रुद्राभिषेक पूजा वैशिष्ट्ये
  • रुद्राभिषेक पूजा पूर्णपणे शास्त्रोक्त आणि संयमित पद्धतीने केली जाते
  • प्रत्येक मंत्र व विधीचा अर्थ सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत स्पष्ट केला जातो
  • पूजेची मांडणी स्वच्छ, सुबक व ध्यानयोग्य वातावरण निर्माण करणारी असते
  • पूजेसाठी लागणारी संपूर्ण सामग्री वंदन तर्फे उपलब्ध करून दिली जाते

मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात रुद्राभिषेक पूजा विधी करण्यासाठी वंदन हे विश्वासार्ह नाव मानले जाते.
आम्ही आजपर्यंत ५०० पेक्षा जास्त रुद्राभिषेक व लघुरुद्राभिषेक पूजा विधी यशस्वीपणे पार पाडले आहेत.

रुद्राभिषेक/लघुरुद्र अभिषेक पूजेसाठी किती गुरुजी असतात.
  • वेदशास्त्र संपन्न असे एकूण 11 गुरुजी असतात.
रुद्राभिषेक पूजेची दक्षिणा काय असते?

९०% पूजासामग्रीसह संपूर्ण रुद्राभिषेक पूजेची दक्षिणा ₹ १५,५०१/- असेल.
यामधील ₹ १,१०१/- रक्कम बुकिंग अमाउंट म्हणून आगाऊ घेतली जाईल.
उर्वरित दक्षिणा पूजा पूर्ण झाल्यानंतर देऊ शकता.

वर दिलेल्या पॅकेजव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त खर्च किंवा किंमत आपल्याला द्यावी लागणार नाही.

आजच आपली रुद्राभिषेक पूजा बुक करा
📞 ८१०४०३०३०० या क्रमांकावर आजच आमच्याशी संपर्क साधा
आणि शांत, अर्थपूर्ण व शास्त्रोक्त रुद्राभिषेक पूजेचा अनुभव वंदनसोबत घ्या.


Rudrabhishek / Laghu Rudrabhishek Puja | Service Across Maharashtra
What is Rudrabhishek / Laghu Rudrabhishek Puja and Why Is It Performed?

Rudrabhishek is a highly significant Vedic ritual performed to seek the special blessings of Lord Shiva.
In this puja, the Shivling is ceremonially bathed (Abhishek) with various sacred substances, while Rudra Sukta and other Vedic mantras are chanted.

The word ‘Rudra’ refers to Lord Shiva, and ‘Abhishek’ means ritual worship through the offering of pure water, Gangajal, milk, and other sacred items.
This puja is performed to reduce life’s difficulties, mental unrest, health-related concerns, and negativity, and to attain peace, good health, stability, and spiritual growth.

Performing the puja at a proper Shubh Muhurat is believed to enhance its positive impact.

Complete Ritual Process
  • The puja begins with Ganesh Puja and Sankalp.
    Varun Puja and Punyahavachan are performed for purification.
    • The Shivling is bathed sequentially with Gangajal, milk, curd, honey, ghee, bilva leaves, jaggery, sugar, and fruit juices.
    • During the Abhishek, Rudra Sukta, Mahamrityunjaya Mantra, and “Om Namah Shivaya” are chanted.
    • The ritual concludes with Shiva Aarti and distribution of Prasad.

The complete Rudrabhishek Puja typically takes 2 to 3 hours.

Benefits of Rudrabhishek / Laghu Rudrabhishek Puja
  • Improvement in physical and mental health
    • Attainment of long life and mental stability
    • Helps in pacifying planetary doshas, including Shani Dosha and Kaal Sarp Dosha
    • Brings peace, harmony, and prosperity in home, family, and business
    • Assists in overcoming obstacles, crises, and financial difficulties
    • Blessings of Lord Shiva bring inner peace, positive energy, and spiritual progress
Why Choose Vandan for Rudrabhishek Puja?
  • Rudrabhishek Puja is conducted strictly according to Vedic scriptures with discipline and clarity
    • The meaning of each mantra and ritual is explained in simple and understandable language
    • The puja setup is clean, well-organized, and conducive to meditation
    All required puja materials are arranged by Vandan, ensuring a seamless experience

Vandan is regarded as a trusted name for performing Rudrabhishek Puja across Mumbai, Pune, Nashik, and the entire Maharashtra.
We have successfully conducted 500+ Rudrabhishek and Laghu Rudrabhishek Puja rituals to date.

How Many Priests Are Required for Rudrabhishek / Laghu Rudrabhishek?
  • A total of 11 Veda-trained priests (Gurujis) perform the ritual.
Rudrabhishek Puja Charges (Dakshina)

The total dakshina for the complete Rudrabhishek Puja, including 90% of the required puja materials, is ₹15,501/-.
An advance booking amount of ₹1,101/- is required.
The remaining dakshina can be paid after the puja is completed.

There are no additional or hidden charges beyond the above-mentioned package.

Book Your Rudrabhishek Puja Today

📞 Contact us today at 8104030300
and experience a peaceful, meaningful, and scripturally performed Rudrabhishek Puja with Vandan.