Vandan Pandit

Garbhasanskar Puja
4.7 (119 reviews)

4.7

(210 reviews)

5,100

(Inclusive of samagree)

गर्भसंस्कार विधी म्हणजे काय व का करतात? | संपूर्ण महाराष्ट्रभर शास्त्रोक्त  गर्भसंस्कार विधी सेवा

सोळा संस्कारांपैकी गर्भसंस्कार विधी हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. गर्भावस्थेतील काळात आईचे मन, शरीर आणि वातावरण याचा थेट परिणाम गर्भातील बाळावर होत असतो. त्यामुळे गर्भातील बाळाचे आरोग्य, संस्कार, मनःशांती आणि सकारात्मक विकास व्हावा यासाठी गर्भसंस्कार विधी केला जातो.

गर्भसंस्कार कधी करावा?
  • गर्भसंस्कार विधी स्त्रीच्या ९ महिन्यांच्या गर्भावस्थेत दोन वेळा केला जातो. या दोन्ही टप्प्यांचे वेगळे आध्यात्मिक व शास्त्रीय महत्त्व आहे.
  • पहिला संस्कार म्हणजे पुंसवन संस्कार, जो साधारणतः गर्भधारणेनंतर २ ते ३ महिन्यांच्या दरम्यान केला जातो. या काळात बाळाचे पहिले स्पंदन म्हणजेच हृदयाचा पहिला ठोका अनुभवता येतो. त्या क्षणी बाळाचे आरोग्य उत्तम राहावे, गर्भधारणेतील सूक्ष्म दोष नष्ट व्हावेत आणि गर्भ मजबूत व्हावा, या उद्देशाने हा संस्कार केला जातो.
  • दुसरा संस्कार म्हणजे सीमंतोन्नयन संस्कार, जो गर्भधारणेनंतर साधारणतः ६ ते ८ महिन्यांच्या दरम्यान केला जातो. या संस्कारामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, तसेच आई-बाळ दोघांचेही आरोग्य, मनःशांती व भावनिक स्थैर्य टिकून राहावे, हा मुख्य उद्देश असतो.
  • पहिला संस्कार (पुंसवन संस्कार) राहिला असेल तर ६व्या ते ८व्या महिन्यात दोन्हीही संस्कार एकत्र करता येतात.
वंदन मार्फत गर्भसंस्कार विधी शास्त्रोक्त पद्धतीने कसा केला जातो?
  • पूजेची सुरुवात करण्यापूर्वी शरीर व मन शुद्ध केले जाते. यासाठी आचमन व प्राणायाम केले जातात, ज्यामुळे पूजेसाठी मानसिक व आध्यात्मिक तयारी होते.
  • त्यानंतर संकल्प विधी केला जातो. या टप्प्यात देवतांना आमंत्रित करून आई-बाळाच्या आरोग्यासाठी मनातील इच्छा व्यक्त केल्या जातात.
  • सर्वप्रथम गणेश पूजन करून नवीन कार्याचा शुभारंभ केला जातो (प्रारंभ).
  • कुलदेवतेची कृपा प्राप्त व्हावी यासाठी मातृका पूजन (कृपा) आणि वसोर्धरा पूजन केले जाते.
  • यानंतर आयुष्य मंत्रांचा जप केला जातो, जो उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि मानसिक-शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.
  • स्वर्गस्थ पितरांचे स्मरण व सन्मान करण्यासाठी नांदीश्राद्ध केले जाते (सन्मान).
  • पुंसवन संस्कारात, वेदोक्त मंत्रांनी पाण्याने भरलेले मातीचे परळ अभिमंत्रित केले जाते तसेच हरळीच्या रसाचा सुगंध गर्भापर्यंत पोहोचवला जातो, ज्याचा उद्देश गर्भशुद्धी व बळकटीकरण असतो.
  • सीमंतोन्नयन संस्कारामध्ये, वैदिक मंत्रांचे पठण केले जाते आणि पती आपल्या गर्भवती पत्नीचे सीमंत विनयन करतात, ज्यामुळे आईचे मन स्थिर व प्रसन्न राहते.
  • महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही संस्कारांमध्ये, संस्कार पतीने गर्भवती पत्नीवर करायचे असतात. त्या वेळी आम्ही वेदोक्त मंत्रपठण करतो.
  • यानंतर होम-हवन करून आहुती दिली जाते (शांती), ज्यामुळे वातावरण शुद्ध होते व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
  • शेवटी ध्यान करून एकाग्रता साधली जाते (एकाग्रता) आणि गर्भसंस्कार विधीचा समारोप होतो.

संपूर्ण विधी अंदाजे १:३० तास चालतो

वंदन पूजा वैशिष्ट्ये काय ?
    • वैदिक संस्कार हे नेहमीच्या पूजांमध्ये येत नाहीत त्यामुळे हे संस्कार करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे प्राविण्य लागते आणि याचसाठी वंदन एक विश्वासार्ह नाव मानले जाते.
    • मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात गर्भसंस्कार विधी पूजा करण्यासाठी वंदन हे विश्वासार्ह नाव मानले जाते. आम्ही आजपर्यंत १००० पेक्षा जास्त गर्भसंस्कार विधी यशस्वीपणे पार पाडले आहेत.
    • पूजा संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते आणि प्रत्येक विधीचा अर्थ आपल्याला समजेल अशा रीतीने समजावून सांगितला जातो. पूजेच्या संपूर्ण सामग्रीची व्यवस्था वंदन तर्फे केली जाते 
पूजेची दक्षिणा काय असते?

९०% सामग्रीसह संपूर्ण पूजेची दक्षिणा रुपये ५१०१/- असेल.  

आपल्याला जर लाइव ऑनलाइन पूजा करावयाची असेल तर २5००/- दक्षिणा. यात आम्ही सर्व साहित्याचे किट पूजेच्या आधी पोहोचवू. तसेच वैदिक संस्कारामध्ये प्रावीण्य असलेले आमचे नाशिक येथील गुरुजी पूजा सांगतील त्यामुळे ती सर्वोत्तम होईल यात शंका नाही. त्यामधील ५०१/- दक्षिणा बुकिंग अमाउंट म्हणून आगाऊ घेतली जाईल. 

वर दिलेल्या पॅकेजव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त खर्च किंवा किंमत आपल्याला द्यावी लागणार नाही.

 आजच आपली गर्भसंस्कार पूजा बुक करा
📞 ८१०४०३०३०० या क्रमांकावर आजच आमच्याशी संपर्क साधा
आणि शांत, संस्कारयुक्त व शास्त्रोक्त गर्भसंस्कार पूजेचा अनुभव वंदनसोबत घ्या.


Garbha Sanskar Puja | Across Maharashtra Service

What is the Garbha Sanskar ritual and why is it performed?

  • One of the sixteen rituals considered to be very important is the Garbha Sanskar ritual.
  • These rituals are performed twice during the 9 months of a woman’s pregnancy.
  • The first rite is the Punsavan Sanskar, which is usually performed between 2 and 3 months after conception. At this time, the baby’s first heartbeat, i.e. the first heartbeat, can be felt. At that moment, this rite is performed to ensure that the baby is in good health and to eliminate all the defects in the seed from which the conception took place.
  • The second ritual, which is performed around 6 to 8 months after conception, is the
  • Seemantonnayan Sanskar. This ritual is performed to increase the immunity of the
  • baby before it comes to earth and to ensure the good health and peace of mind of both the mother and the baby.
  • If the first sanskar (Punsavan Sanskar) is missed, both sanskars can be conducted together between the 6th and 8th month.

How is the Garbha Sanskar ritual performed scientifically through Vandan?

  • Before beginning the puja, the body and mind are purified. For this, Achaman – Pranyama is performed.
  • Then a Sankalpa is made, in which the desires of the heart are expressed by invoking the gods.
  • First of all, a new work is initiated by worshipping Ganesha (beginning).
  • To obtain the blessings of the ancestral deity, Matrika is worshipped (Krupa) and Vasordhara is worshipped.
  • Ayush mantras are chanted mainly to achieve good health, longevity, and increased strength.
  • Ancestors are remembered and honored by performing Nandi Shraddha (Sanman)
  • Punsavan: A clay pot filled with water is invoked with Vedic mantras, and the scent of grass juice is conveyed to the womb.
  • Seemantonnayana: Vedic mantras are recited, the husband performs Seemant Vinayana on his pregnant wife
  • Offerings are made by performing a fire sacrifice (Hom havan)
  • Finally, concentration is achieved through meditation (concentration)

The entire ritual lasts approximately 1:30 hours.

What are the features of Vandan Garbhsanskar Puja

  • Vedic rituals are not included in regular pujas, so performing these rituals requires a certain level of expertise, and for this reason, Vandan is considered a reliable name.
  • Vandan is regarded as a trusted name for performing Garbh Sanskar rituals across Mumbai, Pune, Nashik, and the entire Maharashtra. We have successfully conducted more than 1,000 Garbh Sanskar Pujas till date. The puja is performed in a completely scriptural manner and the meaning of each ritual is explained in a way that we can understand. The entire puja material and samagree is arranged by Vandan.

How much is the charges for Garbhsanskar Puja ?

  • The dakshina for the entire puja including 90% of the materials will be Rs. 5101/-.
  • If you want to do live online puja, then 2500/- dakshina. In this, we will deliver all the material kit before the puja. Also, our Guruji from Nashik, who is proficient in Vedic rituals, will conduct the puja, so there is no doubt that it will be the best.. 501/- dakshina will be taken in advance as the booking amount.
  • Other than the above-mentioned package of ₹5,101/-, there are no additional charges or costs that you need to pay.

Book Your Garbh Sanskar Puja Today

📞 Contact us today at 8104030300

and experience a calm, meaningful, and traditionally performed Garbh Sanskar Puja with Vandan.