नवीन घरात प्रवेश हा प्रत्येक कुटुंबासाठी एक भावनिक आणि महत्वाचा क्षण असतो. हे केवळ घर बदलण्याचं पाऊल नसून, नवीन आयुष्याची सुरुवात असते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत गृहप्रवेश हा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो.
योग्य पद्धतीने, योग्य मुहूर्तावर आणि शास्त्रशुद्ध रीतीने नवीन घरात प्रवेश केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि समृद्धी टिकून राहते.
ही सुरुवात शुभ, शांत आणि दोषरहित व्हावी यासाठी खाली दिलेल्या १० महत्त्वाच्या गोष्टी.
१. गृहप्रवेशासाठी योग्य मुहूर्त ठरवणे
नवीन घरात प्रवेश करताना सर्वात आधी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे योग्य मुहूर्त. आजच्या धावपळीच्या जीवनात, वेळ कमी असला तरी, त्या वेळेत कुटुंबासाठी अनुकूल असा मुहूर्त नक्कीच ठरवता येतो.
अशा वेळी पंचांगानुसार किंवा कुंडलीनुसार योग्य वैयक्तिक मुहूर्त काढता येतो. मुहूर्त हा पंचांगातील तिथी, वार, नक्षत्र पाहून ठरवला जातो. योग्य मुहूर्त घरात सकारात्मक सुरुवात घडवतो
२. घर पूर्णपणे स्वच्छ असणे आवश्यक
गृहप्रवेशापूर्वी घराची संपूर्ण स्वच्छता करणे फार महत्वाचे असते. फरशी, भिंती, स्वयंपाकघर, देवघर, सगळ्या जागा स्वच्छ असाव्यात.
घर स्वच्छ असले की नकारात्मक ऊर्जा दूर होते. नवीन सुरुवातीसाठी मानसिक समाधान मिळते पूजेच्या वेळी प्रसन्ना वातावरण राहते.
३. रिकाम्या हाताने घरात प्रथम प्रवेश करू नये
परंपरेनुसार, घरात कधीही पूर्णपणे रिकाम्या हाताने प्रवेश करू नये. नारळ, तांदूळ, पाणी, गूळ किंवा साखर घेऊन घरात प्रवेश करावा
याचा अर्थ घरात अन्नधान्य, समृद्धी आणि समाधान नांदावं असा असतो.
४.घराची शास्त्रानुसार तपासणी
वास्तुशांती करण्यापूर्वी घराची वास्तुनुसार तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते.
घरातील प्रत्येक दिशा शास्त्रानुसार योग्य आहे का याची खात्री करूनच केलेला वास्तुशांती विधी अधिक सकारात्मक आणि फलदायी ठरते. वास्तुशांतीपूर्वी ही तपासणी केल्याने घरात दीर्घकाळ शांतता, स्थैर्य आणि समृद्धी टिकून राहते.
५.गृहप्रवेश पूजेचा प्रकार ओळखा
सर्व गृहप्रवेश सारखे नसतात. घराच्या परिस्थितीनुसार पूजेचा प्रकार ठरतो. योग्य पूजापद्धती निवडल्याने विधी शास्त्रशुद्ध होतो.
काय करणे योग्य? योग्य पूजेची निवड कशी कराल?
जर तुम्ही त्या घरात राहायला जाणार असाल: पूर्ण वास्तुशांती पूजा करा. यामुळे घरातील प्रत्येक दिशेतील ऊर्जा संतुलित राहते, नकारात्मकता दूर होते आणि घरात शांती, समृद्धी आणि आरोग्य येते.
जर घर गुंतवणुकीसाठी घेतले असेल किंवा अजून राहायला जाण्याची योजना नसल्यास: साधी गृहप्रवेश पूजा किंवा कलश पूजन करा. हे विधी घराच्या पवित्रतेचा आणि देवकृपेचा प्रारंभ करतात.
६.पूजेपूर्वी योग्य तयारी असावी
गृहप्रवेश पूजेच्या आधी आवश्यक तयारी असणं खूप महत्त्वाचं आहे.
पूजेसाठी लागणारा कलश, पूजासाहित्य, (असल्यास) हवन साहित्य आणि देवांच्या मूर्ती किंवा फोटो ही सर्व सामग्री आधीच तयार ठेवली तर पूजेदरम्यान कोणताही गोंधळ होत नाही आणि विधी शांततेत पार पडतो.
७. पहिल्या दिवशी नकारात्मक गोष्टी टाळा
गृहप्रवेशाच्या दिवशी परंपरेनुसार वादविवाद, राग, मोठ्याने बोलणं आणि तणाव यांसारख्या गोष्टी टाळणं योग्य मानलं जातं
दिवस पूर्णपणे सकारात्मक विचारांचा, शांततेचा आणि शुभ सुरुवातीचा असावा.
८. कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती
गृहप्रवेशाच्या वेळी शक्यतो कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य उपस्थित असावेत, कारण त्यामुळे सामूहिक आशीर्वाद मिळतो, कुटुंबातील नातेसंबंध अधिक मजबूत होतात. घरात आपुलकीची भावना निर्माण होते
आजकाल लहान समारंभातही शास्त्रशुद्ध गृहप्रवेश सहज करता येतो.
९. गृहप्रवेशानंतर काही दिवस घरात वास्तव्य ठेवा
गृहप्रवेशानंतर लगेच घर बंद करून बाहेर जाणं टाळावं, कारण घरातील ऊर्जा स्थिर होण्यासाठी वेळ लागतो, कुटुंबाचा वावर सुरू होणं आवश्यक असतं.
पहिले काही दिवस घरात राहिल्यास सकारात्मक वातावरण तयार होतं.
१०. अनुभवी पंडितांची निवड करा
योग्य आणि अनुभवी पंडित निवडणं फार महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळे गृहप्रवेशाचा विधी शास्त्रानुसार पार पडतो, योग्य मंत्रोच्चार होतात, पूजेचा अर्थ समजावून सांगितला जातो.
चुकीची पद्धत किंवा अपूर्ण पूजा टाळण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळतं.
जर तुम्ही शोधत असाल“Gruhpravesh puja Pune”, “housewarming puja”, “gruh pravesh dosh puja Pune”, “vastu based gruh pravesh Pune”, “गृहप्रवेश पूजेची माहिती”, “नवीन घर गृहप्रवेश पूजा” “शुभ मुहूर्तात गृहप्रवेश पूजा” तर वंदन पंडित हा विश्वासार्ह पर्याय आहे.
वंदन पंडित का निवडावे?
वंदन पंडित यांच्या माध्यमातून तुम्हाला
- पंचांगानुसार निवडलेला योग्य मुहूर्त
- वैदिक शास्त्रांनुसार शुद्ध विधीपद्धती
- आवश्यक सर्व पूजासाहित्याची सोय
- प्रत्येक विधीचा अर्थ समजावून सांगणारे मार्गदर्शन
संपर्क
- महाराष्ट्रभर 1500+ प्रशिक्षित आणि प्रमाणित पंडितजींचे नेटवर्क
- संपूर्ण पूजेची सामग्री आमच्या टीमकडून उपलब्ध
- परंपरेनुसार शुद्ध आणि सुसंस्कृत पूजेचा अनुभव
📞 तुमची पूजा आजच बुक करा – 8104030300
🌐 संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा | १५००+ वेदशास्त्रसंपन्न पंडितजींचे नेटवर्क