Annaprashan Sanskar
★
4.9
(121 reviews)
4.7
(210 reviews)
₹5,100
(Inclusive of samagree)
अन्नप्राशन संस्कार | संपूर्ण महाराष्ट्रात सेवा |अन्नप्राशन संस्कार म्हणजे काय व तो का करतात?
शास्त्रानुसार सोळा वैदिक संस्कारांपैकी अन्नप्राशन संस्कार हा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. या विधीद्वारे बाळाला प्रथमच आईच्या दुधाव्यतिरिक्त अन्नाचा परिचय करून दिला जातो. हा संस्कार आजच्या भाषेत baby first food ceremony म्हणूनही ओळखला जातो.
आपल्या शास्त्रांनुसार अन्न हे केवळ पोट भरण्याचे साधन नसून, ते शरीर, मन आणि विचार घडवणारे माध्यम आहे. म्हणूनच अन्नप्राशन संस्कारातून बाळासाठी सुदृढ आरोग्य, दीर्घायुष्य, योग्य पचनशक्ती आणि सकारात्मक सवयींचा मजबूत पाया घातला जातो.
हा संस्कार बाळाच्या जीवनप्रवासातील पहिला अन्नसंस्कार असल्याने तो विशेष काळजीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो.
अन्नप्राशन संस्कार कधी करावा?
- अन्नप्राशन संस्कार साधारणतः बाळाच्या ६व्या महिन्यात किंवा त्यानंतर केला जातो
हा संस्कार करताना खालील गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात:
- पंचांगानुसार शुभ मुहूर्त पाहून
- बाळाच्या आरोग्यस्थितीचा विचार करून
- तसेच डॉक्टर सल्ल्यानुसार, बाळ तयार आहे का हे तपासून करणे आवश्यक असते.
शास्त्रशुद्ध विधींसोबतच वैद्यकीय सल्ल्याचा समतोल राखल्यास अन्नप्राशन संस्कार सुरक्षित, योग्य आणि परिणामकारक ठरतो.
संपूर्ण विधीबद्दल माहिती
- विधीच्या सुरुवातीला आचमन व प्राणायाम करून वातावरण व मन शुद्ध केले जाते.
- त्यानंतर पालकांकडून संकल्प केला जातो, ज्यामध्ये बाळाच्या आरोग्य, बुद्धी आणि सुखी आयुष्याची प्रार्थना केली जाते.
- गणेश पूजन करून विधीचा शुभारंभ केला जातो.
- संबंधित देवतांचे स्मरण करून अन्नाला पवित्रता दिली जाते.
- शास्त्रोक्त मंत्रोच्चारांतर्गत बाळाला षडरस (सहा रस) चाखवले जातात.
- अन्न ग्रहण करताना बाळाच्या पचनशक्ती, अन्नावरील संस्कार आणि शिस्तबद्ध सवयींसाठी प्रार्थना केली जाते.
- बालकाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आयुष्य मंत्र जप केला जातो.
- शेवटी आशीर्वाद, आरती व प्रसाद वितरण करून विधी पूर्ण केला जातो.
संपूर्ण अन्नप्राशन संस्कार साधारणतः १ ते १.३० तास चालतो.
वंदन अन्नप्राशन संस्कार वैशिष्ट्ये
- अन्नप्राशन संस्कार पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने आणि बाळाच्या आरोग्याचा विचार करून केला जातो
- प्रत्येक विधीमागील अर्थ पालकांना सोप्या व समजण्याजोग्या भाषेत समजावून सांगितला जातो
- विधी शांत, वेळेत आणि बाळाला कोणताही त्रास न होता पूर्ण केला जातो
- आवश्यक पूजासामग्रीची संपूर्ण व्यवस्था वंदन तर्फे केली जाते
मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात अन्नप्राशन संस्कार विधी करण्यासाठी वंदन हे विश्वासार्ह नाव मानले जाते. आम्ही आजपर्यंत ५०० पेक्षा जास्त अन्नप्राशन संस्कार पूजा विधी यशस्वीपणे पार पाडले आहेत
पूजेची दक्षिणा काय असते?
९०% पूजासामग्रीसह संपूर्ण अन्नप्राशन संस्कार पूजेची दक्षिणा ₹5101/- आहे.यामधील ₹501/- रक्कम बुकिंग अमाउंट म्हणून आगाऊ घेतली जाईल. उर्वरित दक्षिणा पूजा पूर्ण झाल्यानंतर देऊ शकता.
वर दिलेल्या पॅकेजव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त खर्च किंवा किंमत आपल्याला द्यावी लागणार नाही.
आजच आपला अन्नप्राशन संस्कार बुक करा
📞 ८१०४०३०३०० या क्रमांकावर आजच आमच्याशी संपर्क साधा
आणि शांत, अर्थपूर्ण व शास्त्रोक्त अन्नप्राशन संस्काराचा अनुभव वंदनसोबत घ्या.
Annaprashan Sanskar | Service Across Maharashtra | What is Annaprashan Sanskar and Why Is It Performed?
According to the Vedas, Annaprashan Sanskar is one of the sixteen essential Vedic Sanskars and holds great importance in a child’s early life.
Through this ritual, a baby is formally introduced to solid food for the first time, apart from mother’s milk.
In Indian tradition, food is not seen merely as nourishment for the body. It is believed to influence the mind, digestion, habits, and overall development of a child. Therefore, Annaprashan Sanskar is performed to lay a strong foundation for good health, longevity, proper digestion, and positive eating habits.
As this is the child’s first food-related ritual, it is performed with special care and strictly according to Vedic guidelines.
When Should Annaprashan Sanskar Be Performed?
Annaprashan Sanskar is generally performed:
- In the baby’s 6th month or thereafter
The ritual should be conducted:
- At a Shubh Muhurat as per the Hindu Panchang
- After carefully considering the baby’s health and readiness
Choosing the right time ensures the ritual is both safe and meaningful for the child.
Complete Ritual Process – What Happens?
- The ceremony begins with Achaman and Pranayama to purify the mind and surroundings.
• Parents take a Sankalp, praying for the child’s good health, intelligence, and a happy life.
• Ganesh Puja is performed to mark an auspicious beginning.
• Relevant deities are invoked and the food is introduced through Vedic chants.
• Under Vedas and Mantras chanting, the baby is offered Shad rasa (six tastes) for the first time.
• Prayers are offered for the child’s digestive strength, disciplined eating habits, and healthy relationship with food.
• The ritual concludes with Aarti, blessings, and Prasad distribution.
The complete Annaprashan Sanskar usually takes 1 to 1.5 hours.
Why Choose Vandan for Annaprashan Sanskar?
- The ritual is conducted strictly according to Vedic traditions, with full consideration for the baby’s health and comfort
- Each step is clearly explained to parents in simple, easy-to-understand language
- The ceremony is calm, well-timed, and stress-free for the child
- Complete puja materials are arranged by Vandan, ensuring a hassle-free experience
- Vandan is regarded as a trusted name for Annaprashan Sanskar Puja across Mumbai, Pune, Nashik, and the entire Maharashtra
Ritual Charges (Dakshina)
The total dakshina for the complete Annaprashan Sanskar, including 90% of the required puja materials, is ₹5,101/-.
An advance booking amount of ₹501/- is required.
The remaining dakshina can be paid after the ritual is completed.
There are no additional or hidden charges beyond the above-mentioned package.
Book Your Annaprashan Sanskar Puja Today
📞 Contact us today at 8104030300
and book your Annaprashan Sanskar Puja with Vandan for a peaceful and meaningful experience.
